राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाची भरसभेत उडवली खिल्ली: आदित्य ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया!
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील मनसेच्या सभेत उद्धव ठाकरेंच्या आजारपणावरून टीका केली होती. तसेच राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाची भरसभेत खिल्ली उडवली होती. त्यावरून आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, ‘या विषयावर मला काहीच बोलायचं नाही. परिवार म्हणून आमचं दु:ख आणि वेदना आहेत, त्याच्यावर भाष्य न केलेलं बरं आहे. कारण त्याच्यातून माझे संस्कार दिसून येतील. त्यांना बोलायचं असेल, तर जाऊ द्या. पण त्यांचं बोलणं ऐकून दु:ख झालं आहे’, अशी प्रतीक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे.