मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना ठाकरे यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा पुन्हा एकदा खरपूस समाचार घेतला.
राज ठाकरे म्हणाले, ‘राज्यपाल या माणसाबद्दल काय बोलावं? त्या पदावर आहेत म्हणून सोडून देतो. पद येतं पण पोच येत नाही, त्यातली ही माणसं आहेत. कधी कुठची कोणती गोष्ट बोलावी ? यांना पण कुणी स्क्रीप्ट देतं का ? लक्ष वळवण्यासाठी दुसरीकडे….सरकारला काही गोष्टी विचारल्या जाऊ नयेत, यासाठी हे सगळे प्रयत्न असतात’, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले.