मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी राणे यांनी दोन्ही नेत्यांवर टीकास्त्र सोडलं.
यावेळी ते म्हणाले, ‘माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक कामांना स्थगिती दिली आणि मग एकेक आमदारांना बोलावत होते. त्यांच्याकडून काय खोके घेतले आहेत. ईडीकडे त्याचा सर्व तपशील आहे. संजय राऊत यांना विचारा जेलमध्ये हवा कशी असते ? बाहेर आल्यावर कशी हवा बदलते, असं म्हणत नारायण राणे यांनी ईडी चौकशीचा इशारा उद्धव ठाकरे यांना दिला आहे.