मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भोंग्यांचा मुद्दा समोर आणला आहे.
ठाकरे म्हणाले, “बाळासाहेब जी भूमिका बोलत होते, मशिदींवरील भोंगे उतरले पाहिजेत ती इच्छा आपण पूर्ण केली. आपण मशिदींवरील भोंगे काढा असे नाही म्हणालो, तर हनुमान चाळीसा लावू असं सांगितलं. पण अजून काही जणांची चरबी जिरलेली नाही, त्या धडा शिकवला पाहिजे, जिथे जिथे मशिदींवर भोंगे सुरु असतील तिथे आधी स्थानिक पोलिसांना तक्रार दाखल करा.
दरम्यान, त्यानंतरही काही झालं नाही तर मोठ्या ट्रकमध्ये स्पीकर लावून हनुमान चाळीसा लावा. मला माझ्या महाराष्ट्र सैनिकाकडून ही अपेक्षा आहे, तेच हे करु शकतात, असेही राज ठाकरे यांनी वक्तव्य केले.