मुंबई: मुंबईतील गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये आज सायंकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे गटाध्यक्ष मेळाव्याला संबोधित केले. या मुंबईच्या गोरेगावात राज ठाकरे यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
‘महाराष्ट्रात आता जो काही खोळंबा झाला आहे की त्यामुळे काय होईल हे सांगता येत नाही. सर्वसाधारण फेब्रुवारी मार्चमध्ये निवडणुका लागतील असं आपण पकडून चालूया. मनसेला आज १६-१७ वर्ष झाली. या दरम्यान आपण जी आंदोलनं केली, ज्या भूमिका घेतल्या त्यात आपल्याला इतर पक्षांपेक्षा सर्वात जास्त यश आलं आहे. मात्र मनसेकडून जी आंदोलनं होतील ते लोकांच्या विस्मरणात कसे जाईल यासाठी काही यंत्रणा काम करत होत्या.
तसेच, ‘टोलच्या आंदोलनात अनेकांना अटक झाली. या आंदोलनानंतर राज्यातील ६५हून अधिक टोल बंद झाले. आपण एक पुस्तिका काढत आहोत. ज्यामध्ये गेल्या १६ वर्षात किती आंदोलनं केली. ती कशी यशस्वी झाली याचा आढावा या पुस्तकात असणार आहे, अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली.