“…मात्र वाळूचा किल्ला कोणी बांधलाय हे काळ ठरवेल..”: मुख्यमंत्र्यांच्या टीकेला ‘या’ महिला शिवसेना नेत्याचे प्रत्युत्तर!
मुंबई: आम्ही केलेल्या कामामुळे आम्हाला पाठिंबा मिळत असल्याचे पाहून उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती. यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या महिला नेत्या नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे.
नीलम गोऱ्हे म्हणाल्या, आमच्या पायाखालची वाळू सरकण्याचा काही प्रश्न येत नाही. मात्र वाळूचा किल्ला कोणी बांधलाय हे काळ ठरवेल. वाळूचा किल्ला एका लाटेमध्ये वाहून जाऊ शकतो, तसेच ‘जनतेचं प्रेम अभेद्य आहे. त्यामुळं कोणी जरी इकडे तिकडे हललं असलं तरी फरक पडत नाही, हे देखील यावेळी नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं.