पुणे: राज ठाकरे आणि भाजपची जवळीक वरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.
आमदार रोहित पवार म्हणाले, “राज ठाकरे यांची स्वत:ची एक वेगळी स्टाईल आहे, त्यांनी ती तशीच ठेवायला पाहिजे. मात्र मागच्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांची स्टाईल कुठंतरी भाजपाची स्टाईल झाल्यासारखं राज्यातल्या जनतेला वाटतंय, असा टोला रोहित पवारांनी राज ठाकरेंना लगावला.