नाशिक: सुषमा अंधारे या प्रबोधन यात्रेनिमित्ताने आज नाशिकमध्ये आल्या आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट राणे कुटुंबावर हल्ला चढवला.
त्या म्हणाल्या, “आपला नीतू आणि नीलू प्रचंड आगावू आहेत. नारायण राणे यांनी त्यांना चांगले संस्कार दिले नाहीत. तो व्हिडीओ जुना आहे. विचारांचं खंडनमंडन करावं लागतं. राणेंच्या मुलांचा अभ्यास कमी आहे. मी त्यांचा कणकवलीत जाऊन होमवर्क घेतल्याने ते अस्वस्थ झाले आहेत, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
दरम्यान, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करतानाचा एक व्हिडीओ भाजप नेते नितेश राणे यांनी ट्विट केला आहे. बाळासाहेबांवर थिल्लरपणे टीका करणाऱ्यांच्या हातात शिवबंधन? सांगा कुणी केली गद्दारी? असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांचं हे ट्विट व्हायरल झाल्याने सुषमा अंधारे प्रचंड संतापल्या असून त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.