Latest Marathi News

BREAKING NEWS

 

“उद्धव ठाकरे यांनी बोलताना भान ठेवायला हवे, वाचाळपणा कराल तर….”

0 351

अहमदनगर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्योतिषाला हात दाखवल्याच्या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यावर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या या विधानाचा समाचार घेतला आहे.

 

 

ते म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला हात अगोदरच दाखवलाय. कोणाच्या पाठीवर आणि कोणाच्या गालावर पडला हे सांगायची गरज नाही. त्यांचे भविष्य ठरलेलं आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री झाले हे त्यांचे भविष्य होतं. जनतेने राज्यातील भविष्य ठरवलेलं आहे. पुढची 20 वर्ष शिंदे-फडणवीस सरकारच राज्यात सत्तेत राहील, तसेच उद्धव ठाकरे हे एका पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी बोलताना भान ठेवायला हवे. सत्ता गेल्याने त्यांचा थयथयाट आणि चिडचिड होतेय. मात्र वाचाळपणा कराल तर एकटे पडाल, अशी टीकाही त्यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.