नाशिक : सुषमा अंधारे या नाशिकमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सुहास कांदे आणि दादा भुसे या शिंदे गटाच्या आमदारांना भेटणार असल्याचं उपरोधिकपणे सांगितलं.
त्या म्हणाल्या, “मी येत्या 16, 17 आणि 19 डिसेंबर रोजी नाशिक, मालेगाव, नांदगावला जाणार आहे. कारण सुहास भाऊ (सुहास कांदे) आहे, दादा भुसे आहेत, या भावांना मी भेटायला येणार आहे. सुहास भाऊला विस्ताराने भेटणार आहे. निश्चित भेटणार आहे. अर्थातच मनमाडच्या सुहासभाऊलाच मी त्यांना भेटणार आहे, असं उपरोधिक विधान ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलं आहे.
दरम्यान, अंधारे यांनी उपरोधिक विधान केलं असलं तरी सुषमा अंधारे शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांना भेटणार का? अशी चर्चा रंगली आहे.