मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने आता भाजपमधूनही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी राज्यपालांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर निघायला पाहिजे. २०१४ ला छत्रपती शिवरायांची साथ घेवूनच मोदीजी पंतप्रधान झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान सहन करणार नाही’, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करा’, असे म्हणत मल्लिकार्जुन रेड्डी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका देखील केली आहे.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यपाल बदलण्याबाबत दिल्लीत वरिष्ठांसोबत चर्चा केली. तर राज्याला नवे राज्यपाल मिळणार का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.