“भगवा परिधान करून असं घाण…..”: रामदेव बाबांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर ‘या’ महिला नेत्याचे मोठे वक्तव्य!
नवी दिल्ली: बाबा रामदेव यांनी महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर काँग्रेसच्या महिला नेत्या, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील बाबा रामदेव यांच्यावर सडकून टीका केली आहे.

यशोमती ठाकूर म्हणाल्या, ज्यांना योगगुरु मानले जाते. तो माणूस भगवा परिधान करतो, तो इतक्या खालच्या दर्जाचं वक्तव्य करणं अशोभनीय आहे. देशात व राज्यात खूप विषय आहे. या सगळ्या गोष्टीवर पदडा टाकण्यासाठी व समाजाला देशाला विचलित करण्यासाठी हे वक्तव्य रामदेव बाबा करत आहे, भगवा परिधान करून असं घाण बोलण्याची परवानगी कोणी दिलेली नाही. कोणताही धर्म हे मान्य करणार नाही, अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली.
तसेच, अमृता फडणवीस देखील तिथे होत्या, पण त्या देखील त्या ठिकाणी असंवेदनशील दिसून आल्या,असेही देखील ठाकूर म्हणाल्या.