सातारा : हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा असे त्यांनी विरोधकांना ललकारले. विरोधकांना थेट सरकार पाडण्याचे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. विरोधकांनी दोन दिवसांपासून सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढविला होता.
तसेच, बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात घडलेले मोठं-मोठे शिवसैनिक आज आपल्यासोबत आहेत. गजानन कीर्तिकर, रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ असे ज्येष्ठ नेत्यांनी आपल्यावर विश्वास टाकल्याचे सांगत, त्यांनी ठाकरे गटाला आत्मपरिक्षण करण्याचे, आत्मचिंतन करण्याचा सल्ला ही दिला.
