पुणे : बाबा रामदेव यांनी महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे आक्रमक झाल्या आहेत.
रुपाली ठोंबरे म्हणाल्या, “महिलांनी काय घालायाच काय नाही हा तिच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. बाबा रामदेव यांचं हे वादग्रस्त वक्तव्य अमृता फडणवीस यांच्या समोर झालं आहे. अमृताताईंनी त्याचवेळी कानाखाली ओढली पाहिजे होती. महिलांनी साडी सलवार घालणे इथपर्यंत मान्य पण पुढचं विधान कितपत योग्य आहे, रामदेव बाबांचं डोकं खाली आणि पाय वर करा म्हणजे त्यांच्या मेंदूला रक्त पुरवठा नीट होईल. बाबा रामदेव यांना अक्कल नावाचा प्रकार नाही.रामदेव बाबा पुण्यात आल्यावर त्यांना काळं फसणार, असे वक्तव्य ठोंबरे यांनी केले.

तसेच गृहखात्याने बाबा रामदेव यांच्यावर कारवाई करावी. भाजप निगडीत लोक वारंवार महिलांचा अपमान करतात याची आठवणही रुपाली ठोंबरे यांनी यावेळी करुन दिली.