Latest Marathi News

BREAKING NEWS

अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या चित्रपटांवर बंदी? रक्षित आणि रश्मिकाच्या नात्यावरून वाद!

0 311

मुंबई : अभिनेत्री रश्मिका मंदाना गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. रश्मिकाचा जरी आज चाहता वर्ग वाढला असला तरी रश्मिकाला टार्गेट करणारा देखील एक वर्ग असल्याचे पुढे येतंय. आता रश्मिका मंदानाच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

 

कर्नाटक राज्यात रश्मिकाच्या चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. तसेच, थिएटर मालकांच्या संघटनेने रश्मिकाचे चित्रपट थिएटरमध्ये चालवणार नसल्याची भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे. कर्नाटकमध्ये रश्मिकाच्या चित्रपटांवर लवकरच बंदी येण्याची शक्यता आहे. परंतू यासंदर्भात असून आॅफिशियल घोषणा करण्यात आली नाही . रश्मिकाला सातत्याने कर्नाटक राज्यातून विरोध होताना दिसत आहे.

Manganga

 

रश्मिका आणि अभिनेता रक्षित शेट्टी यांचा साखरपूडा काही वर्षांपूर्वी झाला होता. मात्र, त्यानंतर यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. रक्षित आणि रश्मिका काही दिवसांनंतर वेगळे झाले.

 

कर्नाटकमधील लोकांना असे वाटते की, रश्मिकाने करिअरसाठी रक्षितला धोका दिला आणि साखरपुडा तोडला होता. यामुळे रश्मिकाने कर्नाटकमधील लोकांना धोका दिल्याचे बोलले जाते.

 

 

डबाय चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रश्मिका कर्नाटकमध्ये आल्यानंतर तिने रक्षितचे नाव घेतले नसल्याने लोक तिच्यावर संतापले होते. हे लोक नेहमीच रश्मिकाच्या फोटोवर खालच्या पातळीवर जाऊन टीका देखील करतात.(सौ, tv9 मराठी)

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!