Latest Marathi News

BREAKING NEWS

…’यांचं भविष्य माझ्या हाती’ असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने केली टीका

0 110

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच शिर्डी दौऱ्यावर गेले होते. शिर्डी दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री मिरगाव (सिन्नर) मध्ये ज्योतिषाकडे भविष्य पाहण्यासाठी गेले होते का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. ‘मुख्यमंत्री ज्योतिषाकडे भविष्य पाहण्यासाठी गेल्याचे समजत आहे.

हे खरं असेल तर ही अत्यंत बेजबाबदार कृती आहे,’ अशी टीका त्यांच्यावर करण्यात आली. पण, मुख्यमंत्री भविष्य बघायला गेलेले नव्हते असे स्पष्टीकरण देण्यात आले. साहजिकच, हे स्पष्टीकरण आल्यानंतरही हे प्रकरण शमलेले नाही. याच प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी व्यंगचित्रातून फटकारे लगावत खोचक टीका केली.

Manganga

 

‘माझं काय होईल’ … ‘यांचं भविष्य माझ्या हाती’ अशा आशयाचे व्यंगचित्र काढत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी शिंदे – फडणवीस सरकारची खिल्ली उडवली. नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ‘हात’ दाखवायला ज्योतिषाकडे गेल्याचे माध्यमातून समजले. त्याच गोष्टीचा धागा पकडत क्लाईड क्रास्टो यांनी ज्योतिषाकडे नाही तर फडणवीसांच्या हातात तुमचे भविष्य आहे असे सूचवले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ‘माझं काय होईल’ असे फडणवीस यांना हात दाखवत विचारत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!