ठाणेःठाण्यातील एका कार्यक्रमात स्टेजवर अमृता फडणवीस यांच्यासमोरच रामदेव बाबा यांनी अमृता फडणवीस या अनेक वर्षे तरुण राहतील, यामागची कारणे सांगितली.
ते म्हणाले, “अमृता फडणवीस यांना तरुण राहण्याची प्रचंड इच्छा आहे. त्या नेहमीच मोजून मापून खातात. खुश राहतात. लहान मुलासारखं हसत असतात… त्यामुळे त्या तरुणच राहतील, असे वक्तव्य रामदेव बाबा यांनी केले आहे.

दरम्यान, या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हेदेखील उपस्थित होते. तसेच मंचावर आमदार रवी राणा आणि दिपाली सय्यद देखील योगा करताना पाहायला मिळाले.