Latest Marathi News

BREAKING NEWS

“…माझ्या नजरेने महिलांनी काही नाही घातलं तरी…”:’यांचे’ कपड्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य!

0 657

ठाणे : योगगुरु रामदेव बाबा यांनी आता महिलांच्या कपड्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ठाण्यातील योगा कार्यक्रमात ते बोलत होते.

 

 

Jawale Jewellers

ते म्हणाले,  योगा कार्यक्रमात महिलांनी योगासाठी ड्रेस आणले होते आणि त्यानंतर महिलांसाठी महासंमेलानाचे आयोजन करण्यात आले होते.या महासंमेलानासाठी महिलांनी साड्या आणल्या होत्या. मात्र दोन्ही कार्यक्रम सलग असल्याने महिलांना साड्या नेसायला वेळच मिळाला नाही. याबाब बाबा रामदेव यांनी म्हटलं की साड्या नेसायला वेळ नाही मिळाला, तरी काही अडचण नाही. आता घरी जाऊन साड्या नेसा. महिला साड्या नेसून पण चांगल्या दिसतात. महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या दिसतात आणि माझ्या नजरेने काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असे रामदेव बाबा यांनी वक्तव्य केले.

Manganga

 

 

दरम्यान, यावेळी व्यासपीठावर अमृता फडणवीस, शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे उपस्थि होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.