Latest Marathi News

BREAKING NEWS

‘या’ काँग्रेस आमदाराच्या पत्नीने सोनिया गांधीना पत्र लिहत पतीवरच केला बलात्काराचा आरोप!

0 423

मध्य प्रदेश: मध्य प्रदेशमध्ये एका काँग्रेस आमदाराच्या पत्नीने थेट सोनिया गांधी यांना पत्र लिहून गंभीर आरोप काँग्रेस आमदार पतीवर केलेत. मध्य प्रदेशमधील काँग्रेस आमदार उमंग सिंघार यांच्यावर आधी बलात्काराचा गंभीर आरोप आणि त्यानंतर आता खुद्द त्यांच्या पत्नीनं पत्र लिहून आरोप केला आहे.

 

Jawale Jewellers

माहितीनुसार, आपल्या पतीने अनेक महिलांशी संबंध ठेवले, या संबंधांदरम्यान, ते व्हिडीओ रेकॉर्ड करतात आणि नंतर या व्हिडीओच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग करुन महिलांना त्रास देतो, आपल्यासोबत असाच प्रकार केल्याचं काँग्रेस आमदार उमंग सिंघार यांच्या पत्नीने म्हटले आहे. तसेच, सगळं माहीत असूनही मी सहन केलं, असंही त्यांनी म्हटले आहे. पण आता सगळ्याची हद्द झाली आहे, माझी सहनशक्ती संपली आहे, असं म्हणत त्यांनी आपली व्यथा मांडली आहे

Manganga

 

 

दरम्यान, हे आरोप करणारे पत्र काँग्रेस आमदाराच्या पत्नी सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, मध्य प्रदेशचे काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना देखील पाठवले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.