Latest Marathi News

BREAKING NEWS

संजय राऊतांचा जामीन रद्द होणार?

0 353

मुंबई: कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांना काही दिवसांपूर्वी जामीन मिळाला. मुंबईच्या पीएमएलए न्यायालयाने संजय राऊतांचा जामीन मंजूर केला. दरम्यान, संजय राऊत यांना जामीन मिळातच ईडीने हायकोर्टात धाव घेत जामीन रद्द होण्याची मागणी केली.

 

Jawale Jewellers

दरम्यान, आज ईडीच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पीएमएलए न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करावा, संजय राऊत यांच्याविरोधात आमच्याकडे पुरावे आहेत, असं ईडीने आपल्या याचिकेत म्हटलं आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा जामीन रद्द होणार? की त्यांना दिलासा मिळणार याकडेच सर्वांच लक्ष लागून आहे.

Manganga

 

Leave A Reply

Your email address will not be published.