Latest Marathi News

BREAKING NEWS

आधारकार्डची माहिती चोरून विक्री करणाऱ्या दोघांना अटक

0 24

मुंबई : महाराष्ट्र, दिल्ली आणि गुजरातमधील नागरिकांच्या आधारकार्डची माहिती चोरून त्याची बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्या दुकलीला गुन्हे शाखेच्या कक्ष ६ ने बेड्या ठोकल्या आहेत. दोघांच्या चेंबूर येथून घरातून संगणक, लॅपटॉप, मोबाईल, सिम कार्ड जप्त करण्यात आले आहे. त्यातून आतापर्यंत हजारो नागरिकांचा डेटा चोरी केल्याचा संशय गुन्हे शाखेला आहे.
गुन्हे शाखेच्या कक्ष ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली आहे. साळुंखे यांना गोपनीय खबऱ्याने माहिती दिली. दोघांनी ट्रीनाऊ डॉट को डॉट इन व डब्लूडब्लूडब्लू डॉट फोनिवोटेक डॉट कॉम अशा नावाच्या दोन वेबसाईट तयार केल्या आहेत.

Jawale Jewellers

माध्यमातून महाराष्ट्र, दिल्ली व गुजरात राज्यांतील नागरिकांची त्यांच्या नावावरून किंवा आधारकार्ड लिंक मोबाईल क्रमांकावरून त्यांचे संपूर्ण नाव, गाव, पत्ता सर्व जुने बंद झालेले व चालू असलेले मोबाईल क्रमांक ई-मेल आय.डी जन्मतारीख, कुटुंबातील सदस्य यांची माहिती मिळत असल्याचे खबऱ्याने सांगितले.

Manganga

त्यानुसार, पथकाने दोन्ही वेबसाईटवरून कशाप्रकारे माहितीची देवाण-घेवाण होते किंवा खरेदी-विक्री होते, यादृष्टीने अभ्यास सुरू केला.
तांत्रिक विश्लेषण व गोपनीय पद्धतीने सातत्याने सलग दोन महिने केलेल्या प्रयत्नानंतर, आरोपींचे कार्यालय व निवासस्थान याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार, तेथे लक्ष ठेवण्यात आले. हाती मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे छापा टाकून कारवाई करत दोघांना अटक करण्यात आली.

या कारवाईत त्यांच्याकडून महत्त्वपूर्ण डेटा गुन्हे शाखेने जप्त केला आहे. दोघांना १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.