Latest Marathi News

BREAKING NEWS

वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी निघालेल्या तरुणावर खुनी हल्ला

0 39

पुणे : पुण्यातील कोरेगाव पार्कपरिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये मित्रांसोबत वाढदिवस साजरा करून घरी परत जाण्यासाठी निघालेल्या एका तरुणावर खुनी हल्ला करण्यात आला. हवेत गोळीबार ही करण्यात आला. गुरुवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला असून पाच ते सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Jawale Jewellers

इमरान हमीद शेख (वय 30, ताडीवाला रोड, बंडगार्डन) यांनी तक्रार दिली आहे. सागर कोळनट्टी (वय 36)असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सोन्या दोडमणी, नक्की उर्फ रोहण निगडे, नितीन म्हस्के, धार आज्या यांच्यासह चार ते पाच जण विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Manganga

 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे आपल्या काही मित्रांसोबत कोरेगाव पार्क परिसरातील हॉटेल रॉक वॉटर येथे मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी एकत्र जमले होते. पार्टी संपल्यानंतर दुचाकीने परत जात असताना पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आरोपी सोन्या दोडमनी आणि इतरांनी पूर्वीच्या कारणावरून सागर कोळनटी त्याच्यावर प्राण घातक हल्ला केला. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.