Latest Marathi News

BREAKING NEWS

आधारश्रमात चार वर्षीय चिमुकलीचा गळा दाबून खून

0 31

पुणे : शहरातील म्हसरूळ शिवारातील एका कथित आधाराश्रमात चौदा वर्षाच्या शाळकरी मुलीवर आधाराश्रमाच्या संचालकाकडून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. म्हसरुळ पोलिसांनी संशयित आरोपी हर्षल बाळकृष्ण मोरे (२८,मुळ रा.सटाणा) यास बेड्या ठोकल्या आहे. दोन दिवसांपुर्वीच नाशिक शहरापासून जवळच असलेल्या एका ‘आधारतिर्थ’ नावाच्या आधाराश्रमात चार वर्षीय चिमुकलीचा गळा दाबून खून करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर, आता भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत. वाघ यांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.

Jawale Jewellers

तसेच, राज्यातील सर्व आधार आश्रमांचे ऑडिट व्हावे. किती आधार आश्रम नोंदणीकृत आहेत आणि किती बेकायदेशीररीत्या चालवले जात आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच या प्रकारानंतर आश्रमांचे कायदेशीर मान्यता लक्षात घेऊन बेकायदेशीर चालवण्यात येत असलेले आश्रम उजेडात आलेच पाहिजे, असेही वाघ यांनी म्हटले आहे.

Manganga

 

म्हसरूळ द किंग फाउंडेशन ज्ञानपीठ गुरुकुल आधार आश्रमात संचालकानेच अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी, गुन्हा दाखल झाला असून आरोपीच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. तर, दिपाली खन्ना महिला पोलिस अधिकारी अधिक तपास करत आहेत, अशी माहिती चित्रा वाघ यांनी दिली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.