Latest Marathi News

BREAKING NEWS

म्हसवड बाजार समितीचा सचिव लाचलुचपतच्या जाळ्यात : तक्रारदाराकडून लाच घेताना रंगेहाथ पडकले : सचिवास अटक

म्हसवड/प्रतिनिधी : कृषी उत्पन्न बाजार समिती दहिवडी शाखा म्हसवड येथील बाजार समितीच्या नव्याने बांधण्यात येत असलेल्या व्यापारी गाळ्याचे डिपॅाझीट व भाडे सोडून इतर 50 हजाराची लाच घेताना सातारा लाचलुचपत खात्याने धाड टाकूण कृषी उत्पन्न बाजार समिती दहिवडी शाखा म्हसवडचे सचिव रमेश रामचंद्र जगदाळे वय 56 रा राणंद ता माण यास रंगेहात पकडले असुन लाचलुचपत विभागाने जगदाळे यांच्या राणंद येथील निवासस्थानी हि तपासणी करून अटक केली.

0 733

Jawale Jewellers

म्हसवड मार्केट कमिटच्या मालकीच्या जागेवर नव्याने बांधण्यात येत आसलेल्या गाळ्या मधील एक गाळ्याचे पाच लाख अनामत रक्कम, सोळाशे रुपये महिना भाडे आणि 50 हजार वरची रक्कम द्यावी लागेल तरच गाळा मिळेल असे मार्केट कमिटचे सचिव रमेश जगदाळे यांनी तक्रारदार यांना सांगितले.

Manganga

वरील 50 हजार कशाचे यावर सचिव म्हणाले गाळा घ्यायचा असेल तर 50 हजार द्यावे लागेल यावरून तक्रारदार यांनी थोडी रक्कम कमी करा म्हणून केलेली विनंती धुडकावून लावली. तक्रारदर यांनी शेवटी लाचलुचपत विभागाशी केला. तक्रारदार हे म्हसवड मधील माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आफिस मध्ये पैसे घेऊन गेले होते. त्यावेळी लाचलुचपत विभागाचे साध्या वेशातील अधिकारी यांचे समोर हि रक्कम देण्यात आली. व सचिवाला रंगेहाथ पकडण्यात आले. पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सातारटचे पोलिस उपअधीक्षक सुजय घाटगे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिस निरीक्षक सचिन राऊत, पोलिस नाईक विनोद राजे व संभाजी काटकर यांनी सहभाग घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.