Latest Marathi News

BREAKING NEWS

“तुमचे चिरंजीव बिहारमध्ये जाऊन लोटांगण घालतात, तेव्हा….”: ‘यांचा’ ठाकरेंवर हल्लाबोल!

0 209

 

Jawale Jewellers

कोल्हापूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील तिखट शब्दांमध्ये उत्तर दिले आहे.

 

Manganga

ते म्हणाले, “उद्धव ठाकरे यांची पोटदुखी वेगळी आहे. सत्ता गेल्याचं त्यांना दुःखं आहे”, “तुमचे चिरंजीव बिहारमध्ये जाऊन लोटांगण घालत आहेत. त्यावेळी महाराष्ट्र दुर्बल झाला हे दिसले नाही का?”, “शिंदे सरकारने महाराष्ट्राची जनता ठरवेल की ताकद कमी केली की वाढवली? गेल्या सरकारपेक्षा आम्ही राज्याची ताकद वाढवली आहे. एका क्लिकवर आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले”, असं दीपक केसरकर म्हणाले.

 

तसेच, “आमचे सरकार येऊन चार महिने झाले नाही तोवर टीका करायची. हे तुमचे उद्योग जनतेला माहीत आहे. बोलण्यासाठी कुणी नाही म्हणून माणसं आयात करावी लागतात. आपण कमजोर झालो म्हणून दुसऱ्याला कमजोर म्हणता, अनेक पक्षांचे आधार घेता”, असा टोला त्यांनी लगावला.

Leave A Reply

Your email address will not be published.