मुंबई : राज्यातील सध्याच्या स्थितीबाबत पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे.
ज्यांनी सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड केली, त्यांनी आम्हाला शिकवू नये. आम्ही जे दिवसरात्र काम करत आहोत, हे पाहून यांच्या पायाखालची वाळू सारकली आहे, आत्मविश्वास होता म्हणून तर 50 आमदार आणि 13 खासदार माझ्यासोबत होते. हात दाखवयचा विषय म्हणाल तर आम्ही ज्यांना हात दाखवायचा आहे त्यांना 30 जूनला दाखवला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.