Latest Marathi News

BREAKING NEWS

ईशानेश्वर मंदिरात मुख्यमंत्री शिंदे ‘कशासाठी’ आले होते; ज्योतिषाने केले सगळे स्पष्ट!

0 483

नाशिकः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिर्डी दौरा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिन्नर तालुक्यातील इशानेश्वर मंदिरात गेले. तेथे अंकशास्त्राचे अभ्यासक अशोक खरात यांची त्यांनी भेट घेतली. त्यानंतर आपले भविष्य जाणून घेतले की नाही, याबाबत उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. यावर सिन्नर येथील ज्योतिषी अशोक खरात यांनीच स्पष्टीकरण दिले आहे.

 

Jawale Jewellers

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केवळ ईशानेश्वर मंदिरात दर्शनासाठी आले होते. ते भविष्य जाणून घेण्यासाठी आले नव्हते, असा खुलासा अशोक खरात यांनी केला.

Manganga

 

दरम्यान, याबद्दल दीपक केसरकर यांनीहि प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “प्रत्येकाला पर्सनल आयुष्य असतं. खरात हे शिवभक्त आहेत. त्यांनी गोशाळा बांधण्याचं काम हाती घेतलं आहे. मुख्यमंत्र्यांनी तिथे मदत केली. त्याची वाच्यताही त्यांनी केली नाही, उलट शिंदे यांचं कौतुक व्हायला पाहिजे”, अशी प्रतिक्रिया केसरकर यांनी दिली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.