अकोला : विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत मोदींचा फोटो वापरून शिवसेनेनं मतं मागितली आणि नंतर साथ सोडली, दावा भाजपकडून केला जातो. मात्र शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी वेगळाच दावा केला.
नितीन देशमुख म्हणाले, “2019च्या विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रात निवडणूक प्रचारासाठी कधीही मोदीचा फोटो वापरला गेला नाही. मात्र शिवसेना-भाजप युती असल्याने त्यावळी शिवसेनेने मोदींचा फोटो प्रचारात वापरला होता. त्यादरम्यान निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरल्याने शिवसेनेच्या जागा कमी झाल्या. म्हणजे मोदींचा फोटो लावल्याने आमचं संख्याबळ कमी झालं. मोदींचा फोटो लावल्यानेच आमचं जनमत कमी झालं. 2014च्या निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढली, त्यावेळी कुठेही मोदींचा फोटा वापरला नाही. त्यावेळी शिवसेनेचे 63 आमदार निवडून आले होते, असं नितीन देशमुख यांनी म्हटलं.