Latest Marathi News

BREAKING NEWS

मुलींच्या वॉशरुमध्ये बसवला छुपा कॅमेरा अन….!

572

बंगळुरु: कर्नाटकात गर्ल्स हॉस्टेलमध्ये छुपा कॅमेरा बसवून तरुणाने विद्यार्थिनींचे जवळपास १२०० अर्ध नग्न व्हिडीओ शूट केले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्यांची चौकशी सुरु आहे. शुभम एम आझाद असे आरोपी तरुणाचं नाव आहे.

 

Jawale Jewellers

माहितीनुसार, होसाकेरेहल्लीजवळील एका खासगी महाविद्यालयातील विद्यार्थ्याला मुलींचे अर्धनग्न व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. विद्यार्थिनींचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी आरोपीने मुलींच्या वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा बसवला होता. त्याने १२०० हून अधिक व्हिडिओ आणि मुलींचे फोटो काढले आहेत.

Manganga

 

 

दरम्यान, वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा बसवताना मुलींना त्याला पकडलं, मात्र तेव्हा त्याने तेथून पळ काढला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी वसतिगृहात बसवलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि हा प्रकार उघडकीस आला.

Comments are closed.