Latest Marathi News

BREAKING NEWS

सरकार दोन महिन्यात कोसळेल का ते मी काही सांगू….?: शरद पवार!

0 394

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सिन्नरमधील ईशान्येश्वर मंदिराला भेट दिली. यानंतर त्यांनी एका ज्योतिषाकडून आपलं आणि राज्याचं भविष्य जाणून घेतल्याची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुद्धा एकनाथ शिंदेंना जोरदार टोला हाणला आहे.

 

 

Jawale Jewellers

राज्यातील शिंदे फडणवीस सरकार दोन महिन्यात कोसळेल का? असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला. यावर उत्तर देताना पवार म्हणाले, ‘मी काही ज्योतिषी नाही. मी काही सांगू शकणार नाही. माझा त्याच्यावर विश्वास नाही. तसंही मी हात दाखवायला कुठे जात नाही. आपण आता नवीन गोष्टी पाहत आहोत. जे महाराष्ट्रात कधी नव्हतं, असं म्हणत शरद पवारांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला.

Manganga

 

दरम्यान, शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकारपरिषद घेतली. या पत्रकारपरिषदेत त्यांनी हा टोला लगावला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.