Latest Marathi News

BREAKING NEWS

“आता फक्त मुंबई मागणं बाकी ठेवलं आहे….?”: ‘यांचा’ कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल!

0 192

मुंबई: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी आता सोलापूर आणि अक्कलकोटवरही दावा सांगितल्याने याला आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

 

Jawale Jewellers

अजित पवार म्हणाले की, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी गेले दोन दिवस जे वक्तव्य केले त्याचा धिक्कार करतो. हे महाराष्ट्र मागायला निघाले का? महाराष्ट्र असा तसा वाटतो का? सातत्याने बघतो ही, लोक ज्यांचा सबंध नाही अशी वक्तव्य करून लक्ष विचलीत करत आहे असं म्हणत अजित पवारांनी बोम्मईंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Manganga

 

पुढे अजित पवार म्हणाले, आता फक्त मुंबई मागणं बाकी ठेवलं आहे. या प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करावा. महाराष्ट्र हे कदापि खपवून घेणार नाही. हे ताबडतोब थांबवले पाहिजे अशी मागणी अजित पवारांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.