Latest Marathi News

BREAKING NEWS

“शिंदे हे स्वतःचं भविष्य तयार करणारा माणूस आहे, त्यामुळे….”: ‘यांचे’ मोठे वक्तव्य!

0 208

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी शिर्डी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अचानक आपल्या नियोजित कार्यक्रमात बदल केला. मुख्यमंत्र्यांनी सिन्नरमधील ईशान्येश्वर मंदिराला भेट दिली. यानंतर एकनाथ शिंदेंनी ईशान्येश्वर मंदिरामध्ये एका ज्योतिषाकडून आपलं भविष्य जाणून घेतल्याची जोरदार चर्चा आहे. या प्रकरणावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली आहे.

 

Jawale Jewellers

पाटील म्हणाले, “एकनाथ शिंदे हे स्वतःचं भविष्य तयार करणारा माणूस आहे, भविष्य पाहण्याची गरज नाही. ते भविष्यकाराचे भविष्य सांगतील. कार्यकर्त्यांनी आग्रह केला म्हणून मुख्यमंत्री तिकडे गेले असतील. एकनाथ शिंदे हे स्वतःचं भविष्य तयार करणारा माणूस आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे ते कोणालाही भविष्य दाखवणार नाही, असा दावा पाटील यांनी केला.

Manganga

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.