Latest Marathi News

BREAKING NEWS

नर्ससोबत अफेअर असल्याने पतीनेच केली पत्नीची हत्या

0 72

पुणे : जिल्ह्यात एका 23 वर्षीय हॉस्पिटल वार्ड बॉयला आपल्या पत्नीला इंजेक्शन देऊन तिची हत्या करण्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. महिलेची हत्या केल्यावर त्याने ती आत्महत्या सिद्ध करण्यासाठी प्रयत्न केला होता. पण त्याला यश आलं नाही.
पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की आरोपी स्वप्नील सावंतने एका नर्ससोबत अफेअर असल्याने आपल्या पत्नीची हत्या केली.

Jawale Jewellers

सावंतने मृत प्रियांकासोबत 5 महिन्यांआधी लग्न केलं होते. आणि कपल मुळशी तहसीलच्या कसार अंबोली गावात भाड्याने राहत होते. 14 नोव्हेंबरला सावंत गंभीर स्थितीत प्रियांकाला हॉस्पिटलमध्ये घेऊन पोहोचला. जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. इन्स्पेक्टर मनोज यादव यांनी सांगितलं की, प्रियांकाचं एक कथित सुसाइड नोट मिळाली होती. याच्या आधारावर सावंत विरोधात कौटुंबिक हिंसा आणि आत्महत्येसाठी भाग पाडल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

Manganga

पण चौकशी दरम्यान हे समजलं की, सावंतने वेकोरोनियम ब्रोमाइड, नायट्रोग्लिसरीन इंजेक्शन आणि लॉक्स 2 सहीत काही ड्रग्स आणि इंजेक्शन त्या हॉस्पिटलमधून चोरी केले होते जिथे तो काम करत होता. कथितपणे पत्नीला हेच इंजेक्शन लावून त्याने तिची हत्या केली होती. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.