Latest Marathi News

BREAKING NEWS

सांगली: प्रेमसंबंधातून तरुणाचा खून ; पाच जणांवर गुन्हा

0 175

आरेवाडी : बिरोबा मंदिरासमोरील देवस्थानच्या देणगी कार्यालयात मंगळवार दि. २२ रोजी मारुती ऊर्फ नाना जगन्नाथ कोळेकर या तरुणाचा चाकूने वार करून खून करण्यात आला होता. प्रेमसंबंधातून हा प्रकार घडल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, फरारी हल्लेखोरांच्या शोधासाठी दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. याप्रकरणी मृत मारुती कोळेकर याचा चुलत भाऊ बिरू बाळासाहेब कोळेकर यांनी फिर्याद दिली आहे.

 

Jawale Jewellers

याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मृत मारुती कोळेकर याचे हल्लेखोर अनिल व संजय कोळेकर यांच्या नात्यातील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला होता. यादरम्यान हल्लेखोरांच्या नात्यातील अमोल युवराज घागरे (रा. ढालगाव) याने मंगळवारी सकाळी मारुतीला धमकावले होते. यावेळीही त्यांच्यात वाद झाला. यानंतर मारुती हा देवस्थान समितीच्या देणगी कार्यालयात जाऊन बसला.

Manganga

याप्रकरणी अनिल श्रीरंग कोळेकर (वय ३५), संजय श्रीरंग कोळेकर (३०), बंडू दामाजी कोळेकर, इंद्रजित काशिलिंग कोळेकर (२७, सर्व रा. आरेवाडी), अमोल युवराज घागरे (वय २५ रा. ढालगाव) या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.