Latest Marathi News

BREAKING NEWS

‘असा’ Whats App स्टेटस ठेवत २१ वर्षीय तरुणाने केली आत्महत्या!

0 331

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात बिडकीन एमआयडीसी परिसरात सैन्य भरतीची तयारी करत असलेल्या तरुणाने व्हॉट्सअपवर स्टेट्स ठेवून विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. ओमकार नारायण डांगरे (वय २१ वर्षे) असं मृत तरुणाचं नाव आहे.

 

Jawale Jewellers

याबद्दल अधिक माहिती अशी कि, ओमकार हा घरी काहीही न सांगता बुधवारी सकाळीच घराबाहेर पडला होता. रात्री उशीरापर्यंत तो घरी परतलाच नाही. त्यामुळे ओमकारच्या आई-वडीलांनी त्याचा शोधाशोध घेतला. मात्र, ओमकार कुठेही आढळून आला नाही. अखेर त्यांनी पोलिसांत फिर्याद देताच पोलिसांनी ओमकारचा शोध घेतला, त्याच्या मोबाईलचे लोकेशन डीएम आयसी औद्योगिक वसाहतीत मिळून येत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तिथे जाऊन शोध घेतला असता, एका विहिरीजवळ त्याची गाडी आणि चप्पल आढळून आली. अखेर ओमकारचा मृतदेह विहिरीत आढळून आला.

Manganga

 

 

दरम्यान, ओमकार याने त्याच्या मोबाईलवरील व्हॉट्सअप स्टेटस वर “I just feel like if I died everything will be ok:) ” अशा प्रकारे स्टेटस ठेवत आत्महत्या केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.