Latest Marathi News

BREAKING NEWS

जत तालुक्यानंतर आता सोलापूर आणि अक्कलकोटवरही कर्नाटक सरकारचा दावा!

0 299

सोलापूर: जत तालुक्यातल्या 40 गावांचा वाद ताजा असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी आता सोलापूर आणि अक्कलकोटवरही आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून ट्वीट करत बोम्मईंनी हा दावा केला आहे.

 

Jawale Jewellers

‘कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. उलट महाराष्ट्रातील सोलापूर आणि अक्कलकोट या कन्नड भाषिक भागांनी कर्नाटकात सामील व्हावं, अशी आमची मागणी आहे’ असे बोम्मई म्हणालेत.

Manganga

 

तसेच ते पुढे म्हणाले, ‘फडणवीस यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावर चिथावणीखोर वक्तव्य केले असून त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. राज्याची जमीन, पाणी आणि सीमांचं रक्षण करण्यासाठी आमचं सरकार कटीबद्ध असल्याचे बोम्मई यांनी वक्तव्य केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.