मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणखी बळकट होणार आहे. कारण दलित पँथरने शिंदे गटाला बिनशर्त पाठींबा दिला आहे.
विशेष म्हणजे ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची प्रकाश आंबेडकरांसोबत राजकीय सोयरीक जुळण्याआधीच शिंदे गटाची दलित पँथरसोबत राजकीय सोयरीक जुळलीय. दलित पँथरने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दर्शवला आहे.

दरम्यान, दलित पँथर एकनाथ शिंदे यांच्या गटाला बिनशर्त पाठिंबा देणार, असं सुखदेव सोनवणे यांनी जाहीर केलंय.