मुंबई: राज्यातील २४ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश नगरविकास विभागाने महापालिका आयुक्तांना दिल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांना निवडणुकीचे वेध लागले आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज, बुधवारी पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली.
या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आगामी निवडणुकीसाठीची तयारी करा. राज्यात ज्यांची सत्ता आहे, ते वॉर्ड पुर्नरचना करणारच. त्यांनी ती करू द्या. आपण जिंकण्यासाठी मैदानात उतरू या. मुंबई महापालिका आपल्याकडे राहणार, कामाला लागा’. तसेच सिनेट निवडणुकीच्या तयारीला लागा, असा आदेश पक्षप्रमुख ठाकरेंनी दिला आहे.
