सांगली : सांगलीतील जत तालुक्यावर दावा सांगण्याचा कर्नाटक सरकारने गंभीरपणे विचार करत आहे, असं विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलं आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पाटील म्हणाले, “सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 65 गावांचा पाण्याचा प्रश्न होता. मात्र महाविकास आघाडी सरकार आल्यावर तो प्रश्न मी स्वतः जलसंपदा मंत्री असताना प्रयत्न सुरु केले. 11 ऑगस्ट 2021 ला वारणा प्रकल्पात फेर नियोजनाला मान्यता दिली. त्यानंतर 6 टीएमसी पाणी उपलब्ध झालं. या योजनेचा लाभ या गावांना मिळणार आहे, तसेच जतमध्ये पूर्वी पाणी मिळत नसल्यामुळे गावांनी तसा ठराव केला होता. मात्र आता चित्र बदलले आहे. त्याआधारे कर्नाटक सरकारने गैरवापर करण्यास सुरुवात केली आहे. जत तालुक्यातील लोक त्याला बळी पडणार नाहीत, असे जयंत पाटील यांनी म्हटले.
