राष्ट्रपतींना पत्र लिहत केली कोश्यारी यांना महाराष्ट्रातून हटवण्याची विनंती: शेतकरी नेते राजू शेट्टी!
मुंबई: शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना पत्र लिहून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना महाराष्ट्रातून हटवण्याची विनंती केली आहे. या संदर्भात एक पत्र राष्ट्रपती कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिले आहे.
राजू शेट्टी यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, ‘राष्ट्रपतींना भेट मागितली होती, परंतु मिळाली नाही. राज्यपालांनी पदाची अब्रु घालवली आहे. कधी मराठी माणसाचा, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला. आता तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक वादग्रस्त हे राज्यपाल आहेत. त्यांना महाराष्ट्रातून हटवावं अशी विनंती राष्ट्रपतींकडे केली आहे’.
