मला कॅबिनेट मंत्रीपद काय मुख्यमंत्री पद दिलं तरी…..: ठाकरे गटातील आमदार राजन साळवी यांचे मोठे वक्तव्य!
रत्नागिरी : लांजा-राजापूरचे ठाकरे गटातील आमदार राजन साळवी हे लवकरच शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र या सर्व चर्चांवर स्वत: ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी आपली भूमिका मांडली आहे.
साळवी म्हणाले, मी मरेपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत राहणार. उद्धवसाहेबांचा मी शिवसैनिक आहे. त्यामुळे शिंदे गटात जाण्याचा प्रश्नच नाही. मला कॅबिनेट मंत्रीपद काय मुख्यमंत्री पद दिलं तरी मी शिंदे गटात जाणार नाही. मी मंत्रिपदासाठी भूकेला नाही. माझी निष्ठा बाळासाहेबांच्या चरणाशी आहे, असे राजन साळवे यांनी म्हटले.
