नवी दिल्ली : श्रद्धा वालकरच्या हत्येच्या पोलीस तपासात आता श्रद्धा वालकरचं मृत्यूपूर्वीचं शेवटचे चॅट समोर आलं आहे. हत्याच्या काही तास आधी तिने केलेली चॅटिंग पोलिसांच्या हाती लागली आहे. मला एक बातमी मिळाली आहे, असे श्रद्धाने आपल्या चॅटिंगमध्ये मित्राला सांगितले होते .

माहितीनुसार, श्रद्धा वालकरने 18 मे रोजी हत्येच्या काही तास आधी सायंकाळी सुमारे साडेचार वाजता तिच्या मित्राला मेसेज केला. आतापर्यंत समोर आलेल्या चॅट्सपैकी हे श्रद्धाचे सर्वात शेवटचे चॅट आहे. यात श्रद्धाने मित्राला लिहिले आहे की ‘मला बातमी मिळाली आहे. मी खुप व्यस्त आहे. मित्राने श्रद्धाला विचारले की कोणत्या बातमीबद्दल बोलत आहे, तेव्हा श्रद्धाने याला कोणतेही उत्तर दिले नाही