मुंबई : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वीजबिल माफीबाबतच्या जुन्या वक्तव्याची आठवण करुन दिली. सुप्रिया सुळे यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे.

सुप्रिया सुळे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, “विरोधात असताना तत्कालिन विरोधी पक्षनेते व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्य प्रदेश पॅटर्नचे कौतुक करत वीजबील वसूलीला विरोध केला होता. आता ते सत्तेत आहेत, त्यांच्याकडे अर्थखाते देखील आहे. त्यांनी आता मध्यप्रदेश पॅटर्ननुसार शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ही विनंती. हा यू टर्न आता चालणार नाही.”
दरम्यान, या व्हिडीओ मध्ये देवेंद्र फडणवीस यांची वीजबिलाबाबत सत्तेत नसताना आणि सत्तेत आल्यानंतरच्या भूमिका कशी वेगळी आहे, हे सुप्रिया सुळेंनी दाखवलं आहे.