Latest Marathi News

BREAKING NEWS

भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंग या कारणामुळे अडचणीत!

0 286

नवी दिल्ली: भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंग गोव्यातील बंगल्यामुळं अडचणीत सापडला आहे.. अलीकडेच त्यानं हा बंगला भाडेतत्वावर देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याचा हॉलिडे होम कासा सिंगमध्ये राहू शकता, असं खुलं निमंत्रण त्यानं चाहत्यांना दिलं होतं. या खुल्या ऑफरनंतर युवराज सिंगला नोटीस पाठवण्यात आली आहे. गोवा पर्यटन विभागाकडून त्याला ही नोटीस बजावली आहे. विनापरवानगी बंगला भाडेतत्वावर देऊ शकत नाही, असं या नोटिशीत नमूद केले आहे.

 

Jawale Jewellers

माहितीनुसार, युवराज सिंगचा बंगला गोव्यातील मोरजिममध्ये आहे. चपोरा नदीच्या काठावर कासा सिंग नावाचा हा बंगला युवराज सिंगच्या क्रिकेटशी संबंधित आठवणींशी जोडलेला आहे. मात्र, या बंगल्यावरून गोवा पर्यटन विभाग युवराज सिंगवर नाराज आहे.

Manganga

 

 

दरम्यान, युवराज सिंगला नोटीस बजावल्यानंतर पर्यटन विभागाने त्याला ८ डिसेंबरला विभागाचे उपसंचालकांसमोर हजर होण्यास सांगितले आहे. या सुनावणीसाठी हजर झाला नाही तर त्याला १ लाख रुपये दंड भरावा लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.