Latest Marathi News

BREAKING NEWS

“गुजरातमध्ये निवडणुका मग महाराष्ट्रात का पगारी सुट्टी दिली?”: ‘यांचा’ राज्य सरकारवर हल्लाबोल!

0 308

मुंबई: गुजरात निवडणुकांचे बिगुल वाजले असून या निवडणुकीत महाराष्ट्रातील गुजराती बांधवांना मतदान करता यावं यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने पगारी सुट्टी जाहीर केली. दरम्यान, या निर्णयावरून अजित पवार यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.

 

Jawale Jewellers

अजित पवार म्हणाले, ‘आम्हीही १५ वर्ष सत्तेत होते. त्यावेळी मध्यप्रदेश, गोव्यात निवडणुका झाल्या. मात्र, आम्ही कधी अशी पगारी सुट्टी दिली नाही, अशा प्रकारे नवीन पायंडा पाडणे चुकीचं आहे, राज्याचा गाडा हाकताना अधिकारी सहा महिने पगारी सुट्टी घेत असेल आणि उर्वरित सहा महिने काम करत असेल, तर हा जनतेचा टॅक्स रुपाने आलेला पैशांचा गैरवापर आहे, असे ते म्हणाले.

Manganga

 

दरम्यान, विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी आज मुंबईत पत्रकारपरिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.