Latest Marathi News

BREAKING NEWS

आधी आमदार, मग प्रकल्प असे म्हणत ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा…

0 60

मुंबई : राज्यात अचानक सत्तापालट झाली असून आता मुंबई महापालिका निवडणुका कुठल्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. = शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे बिहार दौऱ्यावर जाणार असल्यानं चर्चेला उधाण आले आहे. आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्यामागचं नियोजन सांगितले नसले तरी १ दिवसीय दौऱ्यात ते बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहेत. यासंदर्भात आता स्वत: आदित्य ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात, शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. तर, देवेंद्र फडणवीसांच्या कामाचं कौतुकही केले.

 

Jawale Jewellers

तुम्हाला माहिती आहे आज मी बिहार दौऱ्यावर आहे, ते उपमुख्यमंत्री म्हणून चांगले काम करत आहेत. त्यामुळे क्लाईमेंट चेंज आणि पर्यावरण या विषयावर चर्चा करू. असे म्हणत आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केले.

Manganga

 

आजची मंत्रीमंडळ बैठक रद्द करण्यात आली. कारण, एक पक्ष दुसऱ्या राज्याच्या प्रचारात व्यस्त आहे. त्यांनी आधी आमदार, मग प्रकल्प आणि आता मंत्री गुजरातला पाठवले. महाराष्ट्रात बेरोजगार, ओला दुष्काळ असे असंख्य प्रश्न असताना मंत्रिमंडळ तिकडे प्रचारात व्यस्त आहे. महाराष्ट्रासाठी एक तास दिला असता तर काही वाईट झाले नसते, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे गट आणि शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला.
.

 

Leave A Reply

Your email address will not be published.