Latest Marathi News

BREAKING NEWS

‘सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा दावा’: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे प्रत्युत्तर!

0 578

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील ४० गावं कर्नाटकात सामील होतील, असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा करण्याच्या तयारीत आम्ही आहोत. या मुद्द्यावर आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

 

Jawale Jewellers

दरम्यान, बोम्मई त्यांच्या या दाव्यानंतर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नाही, असं सणसणीत प्रत्युत्तर बोम्मई यांना दिले आहे.

Manganga

 

फडणवीस म्हणाले, ‘2012 साली ठराव केला होता. आता कोणत्याही गावाने कोणताही ठराव केला नाही. ज्यावेळी मी मुख्यमंत्री होतो तेव्हा आम्ही कर्नाटकशी तडजोड करून त्यांना हाव तिथं पाणी देऊन आम्हाला पाणी हवं तिथ घेऊ असा निर्णय केला होता. त्यानंतर सुधारित योजना होती. त्या नव्या योजनेमध्ये त्यांना समाविष्ट करण्याचा निर्णय त्यावेळचे तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला होता. तशी योजनाही केली होती. ती तयार झाली आहे, आता त्या योजनेला आपण मान्यता देणार आहोत,असे वक्तव्य फडणवीस यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.