Latest Marathi News

BREAKING NEWS

आई-बाबा मला माफ करा सुसाईट नोट लिहून तरुणाची जाळून घेऊन आत्महत्या

0 57

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सिद्धार्थ संशोधक विद्यार्थी वसतिगृहातील जाळून घेतलेल्या संशोधक विद्यार्थ्याच्या खोलीत डिजिटल फळ्यावर लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत मंगळवारी दुपारी जप्त केली. त्यावर त्याने ‘आई-बाबा, मला माफ करा… दुसऱ्या जन्मात आपली परतफेड करेन’ अशी सुरुवात करीत आठ ओळी लिहिल्या आहेत. त्याशिवाय डायरीमध्ये प्रेमप्रकरणाविषयी लिहून ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली. जळालेल्या तरुणीचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती घाटीतील डॉक्टरांनी दिली.

Jawale Jewellers

गजानन खुशालराव मुंडे (३०, रा. दाबा दिग्रज, ता. जिंतूर, जि. परभणी) या संशोधक तरुणाने शासकीय न्याय सहायक विज्ञान संस्थेतील प्रयोगशाळेत स्वत:ला जाळून घेत पीएच.डी. संशोधक पूजा कडूबा साळवे (रा. एन ७, सिडको) या तरुणीला कवटाळले होते. यात गजाननचा मृत्यू झाला तर तरुणी मृत्यूशी झुंज देत आहे. दोघांनी पोलिसांना परस्परविरोधी जबाब दिल्यामुळे प्रकरणाचा गुंता वाढला आहे.

Manganga

त्याशिवाय पोलिसांनी विद्यापीठातील वसतिगृहातील तरुणाच्या खोलीचे कुलूप तोडून आतमध्ये असलेली सुसाईड नोट, दुचाकीसह इतर साहित्य पंचनामा करून जप्त केले. त्यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. भगवान साखळे, डॉ. भास्कर साठे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
याशिवाय त्याने जालना येथील रामनगरच्या महादेव मंदिरात तरुणीसोबत लग्न केले होते. त्याला तिला नांदवायचे होते, मात्र त्यास तिचा नकार असल्यामुळे त्याने हायकोर्टातील एका वकिलाचा कायदेशीर सल्लाही घेतला होता. याविषयीचा उल्लेखही त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत केला आहे. त्या दृष्टीनेही पोलिस तपास करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.