Latest Marathi News

BREAKING NEWS

दुसऱ्यासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून प्रेयसीचा गळा चिरून खून

0 53

पुणे : चाकूने गळा चिरून व दगडाने ठेचून महिलेची निर्घृणपणे हत्या करून मृतदेह झुडपात फेकून देऊन फरारी होण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रियकरास अवघ्या चोवीस तासात महाळुंगे इंगळे गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी मंगळवारी ( दि. २२ नोव्हेंबर ) बेड्या ठोकल्या आहेत.

Jawale Jewellers

निकिता संभाजी कांबळे ( वय – २८, सध्या रा. खराबवाडी, ता. खेड, मूळ रा. कवठा, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद ) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर तिच्या हत्येप्रकरणी तिचा प्रियकर राम कुंडलिक सूर्यवंशी ( वय – ३९, रा. पवार वस्ती, साईबाबा मंदिर, दापोडी, पुणे,) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
अधिक वृत्त असे की, निकिता कांबळे व राम यांचे यापूर्वी एकत्रित एलेप्रो मॉल चिंचवड येथे काम करीत असताना सूत जुळले. त्यानंतर काही दिवसांनी निकिता हिचे आणखी कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याबाबत राम याला संशय आला. तसेच राम याचे लग्न झाल्यामुळे त्याच्या घरातील लोकांना सदर प्रेमसंबंधाबाबत माहिती झाली होती. त्यामुळे राम याची पत्नी त्याच्याबरोबर बोलत नव्हती. तसेच निकिता ही सुद्धा राम याच्याबरोबर बोलत नव्हती. ती त्याला टाळू लागली होती. त्यामुळे रागाच्या भरात राम याने रविवारी ( दि. २० ) दगडाने ठेचून व धारदार हत्याराने गळा चिरून निकिता हिची हत्या केली होती.

Manganga

निकिता ही खराबवाडी येथे तिचा भाऊ व तिच्या दोन लहान मुलांसह राहत होती. तिच्या पतीचे गेल्या सहा महिन्यापूर्वी निधन झाले आहे. ती येथे एका खाजगी कंपनीत काम करत होती. महाळुंगे इंगळे पोलीस पुढील तपास करत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.