Latest Marathi News

BREAKING NEWS

धक्कादायक: शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

0 79

 

Jawale Jewellers

पुणे : प्रतिनिधी/किरण शिंदे : चित्रकलेचे शिक्षण देणाऱ्या एका शिक्षकांनी 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला. ही तरुणी या शिक्षकाकडे चित्रकलेचे शिक्षण घेण्यासाठी जात होती. मात्र “तू केस मोकळे सोडत जा, सुंदर दिसतेस, आय लव्ह यु” म्हणत या शिक्षकाने तिचा विनयभंग केला. चतु:शृंगी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Manganga

निलेश नानासाहेब पवार (वय 49, रा. भगवती नगर सुतारवाडी पाषाण) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. सोळा वर्षीय तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की पाषाण परिसरात आरोपीचा आर्ट स्टुडिओ आहे. 16 नोव्हेंबर रोजी फिर्यादी या स्टुडिओमध्ये एकट्या असताना आरोपीने त्यांच्या पायाला स्पर्श केला.

त्यानंतर “तू मला खूप आवडते, तू केस मोकळे सोडत जा, मोकळे केस असताना तू खूप सुंदर दिसते” असे म्हणत फिर्यादी यांच्या पायाला आणि गालाला चिमटा घेऊन विनयभंग केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास सुरू आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.